पंढरपुरात कोरोनाच्या नावाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट

0
पंढरपूर : कोरोनाशी लढा देण्यासाठी सारा देश सज्ज झालाय. सरकारने विविध उपाययोजना जाहीर करुन शेतकरी, मजूर, कष्टकरी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, काही  लोक कोरोनाचे संकट संधी म्हणून घेताना दिसत आहेत. खासगी दूध डेअरी चालक दुधाचे दर पाडून शेतकऱ्यांची लूट करताना दिसत आहेत.
         काल पासून पंढरपूर क्षेत्रा मध्ये ग्रामीण भागात दुध उत्पादक सोनाई दुध 24 रु प्रतिलिटर,नेचर डिलाईट 20 रु प्रतिलिटर या भावाने दूध खरेदी चालू असून. पंढरपुरात अनेक ठिकाणावरून शेतकर्यांची लुट चालू असल्याच्या तक्रारी येत आहेत. 
        पंढरपूर शहरात चौकशी केली असता तेथील डेअरीची किरकोळ विक्री 52 रु प्रतिलिटर आहे. यामध्ये दुधउत्पादक शेतकरी व ग्राहक यांच्यात 32 रु प्रतिलिटर तफावत आहे.एक तर कोरोना च्या पार्श्वभूमीवर शेतकरी संकटात आहे आणि त्यात अशा प्रकारची लूट चालू आहे. अशा या परिस्थितीत शेतकऱ्यांना आपली जनावरे जगवणे देखील मुश्किल झाले आहे. एकंदरीतच ही लूट तात्काळ न थांबल्यास जनावरे सोडून दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे दुध उत्पादक शेतकरी सांगत आहेत. 
          आशा प्रकारे शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या खासगी दुध डेअरीवर कारवाई करण्याची मागणी श्री.सोमनाथ भिंगारे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र राज्य आणि श्री.दिपक पाटील सोलापूर जिल्हा  अध्यक्ष छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे. तसेच जर कुठल्याही  दुध संकलन केन्द्र कमी दराने दूध खरेदी करत असेल तर खालील नंबर वर संपर्क करून आम्हाला माहिती द्यावी जेणे करून आम्ही आपली मदत करू शकू असे ही माध्यमांशी बोलताना श्री. सोमनाथ भिंगारे आणि श्री.दीपक पाटील यांनी सांगितले
संपर्क क्रमांक : +91 74988 60660

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)