पंढरपूर : कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्याकरिता देशभरात 21 दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर करण्यात आले आहे कोरोना चा प्रभाव टाळण्यासाठी ठीक ठीकानी निर्जंतुकीकरणं औषध फवारणी करणे महत्त्वाचे आहे. याच गोष्टी चा विचार करून नगरसेवक श्री. प्रशांत शिंदे-पाटील प्रभाग क्रं 13 मध्ये लिंक रोड़, शिंदेशाही, समतानगर ईसबावी येथे कोरोना(COVID-19) या जीवघेण्या रोगाचा प्रसार होऊ नये या साठी ड़्रगन ब्लाॅवर च्या सहाय्याने औषध फवारणी करण्यात आली आहे. आणि उर्वरित प्रभागा मध्ये ही लवकरात लवकर केली जाईल.
#घाबरू नका काळजी घ्या
तसेच माध्यमाशी बोलताना ते म्हणाले नगरसेवक या नात्याने खऱ्या अर्थाने आज महत्वपूर्ण वेळ व जबाबदारी आली आहे माझ्या प्रभागातील नागरिकांची कोरोना सारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्याची, त्याकरिता मागील काही दिवसांपासून स्वतः रस्त्यावर उतरून प्रभागामध्ये फवारणी करून घेत आहे. आपण सर्वांनी मिळून काळजी घेऊया आणि आपला व आपल्या कुटुंबीयांचा यापासून बचाव करूया.कोणत्याही क्षणी कोणत्याही नागरिकाला काहीही मदत लागल्यास 9922472030 या माझ्या मोबाईल नंबर वर सम्पर्क करा.तुमच्या सेवेत - तुमचा सेवक उपस्थित असेल असे त्यांनी सांगितले.

