पंढरपूर : कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्याकरिता देशभरात 21 दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. आपला भारत देश एका विकसित स्तरावर वाटचाल करत असतानाच....आपल्या भारत देशावर जागतिक संकट आले आहे. कोरोना या विषाणु वायरस मुळे समाजातील प्रत्येक घटकावर प्रत्येक्ष व अप्रत्यक्ष रीत्या परिणाम होत आहे. त्यावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी घरी राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. संसर्ग चा प्रधुर्भाव टाळण्यासाठी म्हणून सरकारने सर्व शाळा,महाविद्यालये इतर गर्दी होणारी सर्व ठिकाणे काही कालावधी साठी बंद करण्यात आली आहेत. म्हणुन आपण सर्वजण घरी निवांत असाल ह्या हेतुने मी विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक मित्रांच्या अभ्यासासाठी, लिखाण करण्याची चालना मिळावी म्हणून एक छोटासा प्रयत्न @युवा निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
आपला भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो.त्याच दृष्टिकोनातून ही निबंध स्पर्धा ठेवण्या मागचा उद्देश, आपण खाली दिलेल्या विविध विषयांवर विचार करुन आपणांस काय वाटते त्यावर आपले मत व्यक्त करणार आहात. आज आपण पाहिले तर युवकांसमोर अनेक आवाहने आहेत.अनुसरुन विषय घेतले आहेत. युवतींना राजकारणा विषयी काय वाटते? तरी स्पर्धकानी आपल्या भाषेत लिखाण करावे. @युवा निबंध लेखन स्पर्धेस भरघोस प्रतिसाद दयावा.
स्पर्धेसाठी चे विषय खलील प्रमाणे असतील.
१)शेती आणि आजचा शेतकरी २). नैसर्गिक आपत्ती व्यवस्थान
३) मराठी नववर्ष ४) विभाजन.,आजची कुटुंब व्यवस्था.
५)आजची शिक्षण प्रणाली. ६) युवती आणि राजकारण.
७) कॉलेज जीवनातील तुम्ही...८)आवडते पर्यटनस्थळ.
९) बेरोजगारीवर मात होऊ शकते का?? १०)मी निसर्गप्रेमी.
११)देशहितासाठी माझी वाटचाल.
स्पर्धेसाठी च्या नियम व अटी:-
१.वरील पैकी कोणतेही एका विषयावर निबंध असावा
२.शब्द मर्यादा नाही. ३.निबंध मराठी भाषेत लिहिलेला असावा.
४. जसे असेल तसे अक्षर चालेल.५. वयोमर्यादा १६ ते २६.
बक्षिसे:-
प्रथम पारितोषिक रु ५२२ व सन्मानचिन्ह.
द्वितीय पारितोषिक रु ४२२ व सन्मानचिन्ह.
तृतीय पारितोषिक रु ३२२ व सन्मानपत्र.
उत्तेजनार्थ पारितोषिक रु २२२ ससन्मानपत्र
उत्कृष्ट निबंध सन्मानपत्र व सन्मानचिन्ह
आपला निबंध कसा आणि कोठे पाठवावा
दिनांक १२ एप्रिल २०२० पर्यंत खालील ई-मेल किंवा व्हाट्सअप किंवा प्रत्यक्ष हस्ते ह्याद्वारे पाठवावेत.
दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी निकाल आपणांस कळण्यात येईल.विजेत्यांना बक्षिस वितरण ठिकाण कळण्यात येईल. आपण निबंध खालील ई-मेल वर किंवा व्हाट्सअप, किंवा पत्तावर पाठवावेत.
१. penurmohol@gmail.com
२. ९५४५४३४२९२.
३. एन.एम फार्महाऊस, मु/पो पेनुर ता.मोहोळ जिल्हा सोलापूर.४१३२४८.
आपल्या निबंधासोबत खालील माहिती देऊन सहकार्य करावे.
स्पर्धकांचे पुर्ण नाव ,संपूर्ण पत्ता ,आपला ई-मेल,शिक्षण व संपर्क नंबर
तरी आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येते की, आपण ह्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. लिखाण भाषा मराठी असेल. प्रत्येक सहभागी स्पर्धकास सन्मानपत्र देण्यात येईल.
असे आवाहन आयोजक श्री.विशाल नामदेव माने. विद्यार्थी-क.भा.पा महाविद्यालय पंढरपूर. एन.एस.एस स्वयंसेवक
यांनी केले आहे तसेच स्पर्धे बद्दल कोणतीही अडचण किंवा आणखी काही माहिती हवी तर या नंबर वर ९५४५४३४२९२ संपर्क करावा असे आवाहन आयोजकान तर्फे करण्यात आले आहे .

