रक्तदान हेच श्रेष्ठदान ! रक्तदानासाठी सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी - श्री.प्रशांत शिंदे-पाटील (अपक्ष नगरसेवक पं.न.पंढरपुर)

0
पंढरपूर : सध्या परिस्थितीत कोरोनाचे गंभीर ग्रहण आपल्या देशाला लागले आहे. अशा कठीण परिस्थितून आपण सर्व जात आहोत. यामध्ये डॉक्टर, पोलिस प्रशासन अहोरात्र आपल्यासाठी मेहनत करीत आहेत. सध्या रुग्णालयात रक्ताचा साठा कमी पडतो आहे, त्यामुळे समाजासाठी आपणही काही योगदान देऊ शकतो या भावनेने मदतीचा एक हात म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. सध्या आपण कोरोना व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.परंतु रक्ताचा तुटवड़ा जाणवत आहे.राज्याचे आरोग्यमंत्री मा. राजेशजी टोपे यांनी रक्तदानाचे आवाहन केले आहे.याला प्रतिसाद देत श्री.प्रशांत शिंदे-पाटील (अपक्ष नगरसेवक पं.न.पंढरपुर) व शिंदेशाही फाॅमिली यांच्या वतिने शिंदेशाही रेसिड़ेन्सी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोशल ड़िस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत अनेकांनी रक्तदान केले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)