शेतकरी बांधव करू शकतात का वर्क फ्रॉम होम.....सरकार नी शेतकरी बांधवाचा विचार करावा या साठी लिहीले पत्र.... शिवश्री समाधान सुरवसे

0
#छावा क्षात्रवीर सेनेच्या महाराष्ट्र राज्य विनंती_अर्ज

प्रती,
मा.श्री.मुख्यमंत्री साहेब
मा.श्री.उपमुख्यमंत्री साहेब 
मा.श्री.आरोग्यमंत्री साहेब
मा.श्री.कृषीमंत्री साहेब 
महाराष्ट्रराज्य 

विषय:- कोरोना या संसर्गजन्य रोगासाठी घरात रहा.पण शेतकऱ्यांसाठी शक्य आहे का?

मंत्री महोदय,

मि शिवश्री समाधान सुरवसे संस्थापक अध्यक्ष .साहेब एक युवा शेतकरी म्हणुन सर्व जबाबदारी व खबरदारी पणे आपल्याशी बोलणार.

"सध्या आपल्या देशावर कोरोनाचे संकट पसरत आहे,पुर्ण देशात भीतीचे वातवरण आहे.देशातील सर्व जनतेला मोठी हिम्मत देण्याची गरज आहे.आणि आपण ही परिस्थिती योग्य प्रकारे नियंत्रित ठेवत आहे.आपण सर्व मिळुन या रोगावर मात करु.या मध्ये काही शंकाच नाही."

सध्याची परिस्थिती पाहता देशातील सर्व Govt,Private ऑफ़िसला बंद करायचे आदेश सरकारनी दिले व पगार न कापन्याचे सांगितले.
"आम्हाला काही तुमच्या सुट्टीवर किवा पगारावर बोलायचे नाही आहे कारण तुम्ही पण शेतकऱ्याचे मुल आहे."
आज सर्व नोकरदार वर्ग मोठया प्रमाणावर मोठी शहरे सोडून सुट्टी घेऊन आप आपल्या गावाकडे म्हणजे खेड्यात येत आहे.

साहेब सर्व विचार करत असताना कुठेतरी शेतकऱ्यांचा विचार पण मनात येतो की शेतकरी स्व:ता साठी पिकवतो की देशासाठी???

"आज खर पाहता कोरोनामुळे सर्व जनतेला घरात बसावे लागणार,कोणी work from Home करणार, तर कोणी laptop वर आपले काम पुर्ण करणार कारण मार्च Ending असल्यामुळे कामाचा व्याप मोठा असतो.असो.

"पण हे सर्व करत असताना जिवंत रहायला अन्न पण लागत ते Work from Home म्हणजे घरी बसुन,किवा लैपटॉप वर होत नाही.तर
 
#शेतकऱ्यांला तर पहाटे उठल्यावर गाय,म्हैस चे दूध काढून,बैलांचे शेण-पाणी करुन शेतात कामावर गेल्याशीवाय काही पर्यायच नाही.
तो शेतात स्व:ताला जिवंत राहण्यासाठी तर जातोच,पण सोबत देशातील जनतेसाठी पण जातो, हे मात्र विसरता कामा नये.कारण तुमच्या जिवंत दैनंदिन गरजा सकाळच्या दुधापासुन तर रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व शेतकरी पुरवतो हे लक्षात घेतले पाहिजे.

*ते म्हणतात न #जेवताना_शेतकऱ्यांचे अन #झोपताना #जवानाचे आभार मानले पाहिजेत.*

साहेब,आम्हाला बोलायचे एवढेच की शेतकरी हा देशाचा कर्ता आहे.तो एका दाण्याचे लाख दाणे बनवतो.पण जेव्हा शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट येते तेव्हा शेतकरी सरकारला कर्जमाफ़ी मागतो,ओला/कोरडा दुष्काळ पडतो तेव्हा नुकसान भरपाई मागतो.

"आज कोरोना आला तुम्ही जसे सरकारला विनती करुन सुविधा,सुट्ट्या,पगार न कापण्याचे निवेदन देत आहे ना? असेच निवेदन शेतकरी सरकारला देतो,तर काहीना खुप त्रास होतो की #शेतकऱ्यांला_कर्जमाफ़ीची,#नुकसान #भरपाईची_फ़ुकट_खाण्याची सवय सरकारनी लावली असे म्हणनारे खुप आहेत.पण शेतकऱ्यांची मजबुरी समजून घ्यायचा कोणी वाली नाही..
साहेब आज आमच्या मालाची काय परिस्थिती आहे कांदा मार्केट बंद असल्यामुळे भाजीपाला मार्केट बंद असल्यामुळे  नुकसान आमच्या शेतात पिकवलेल्या मालाला भाव नाही नोकरदार वर्गाला काही फरक पडत नाही कारण त्यांचा पगार चालू असतो शेतकऱ्यांची काही पगार नसतात.

साहेब आम्हाला एवढच बोलायचे आहे की,आमच्या पण समस्या असतात,आम्हाला पण जगायचे असते.फक्त आम्ही जे पिकवतो त्याला योग्य हमीभाव द्या नैसर्गिक आपत्ती आल्यास त्वरित नुकसान भरपाई द्यावी.विनव्याजी शेतकरी कर्ज सुविधा द्या..शेतकरी मेडिकल विमा द्या.अशी मागणी करतो.

काळ्या मातीची शपत घेऊन सांगतो देशावर कुठलं पण संकट आले तर पुर्ण शेतकरी आपल्या सोबत खंबीर उभा असणार.

!! खुप श्रम करुन तो शेती करतो !!
!! पुरेसा भाव न मिळल्याने मात्र तो आत्महत्या करतो!!

आपला विश्वासू 
शिवश्री समाधान सुरवसे 
संस्थापक अध्यक्ष छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र राज्य .
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)