देशातील एक मोठा वर्ग असणारा गरीब वर्ग आणि शेतकऱ्यांना दिलासा १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं पॅकेज. - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

0

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या भारत देशातील प्रत्येत नागरिकासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये अर्थमंत्र्यांनी गरीब जनतेला प्राधान्य देत त्यांच्यासाठी अतीव महत्त्वाच्या घोषणा करत अन्नधान्य पुरवठा आणि वित्तीय तुटवड्याची झळ या वर्गाला बसणार नाही याची काळजी घेतली. नोकरदार वर्गासाठीही सीतारमण यांनी काही तरतुदी जाहीर केल्या.

केंद्र सरकारकडून गरिबांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं पॅकेज. कष्टकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा.

-प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची घोषणा

-आरोग्य सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला ५० लाखांचा आरोग्य विमा. २० लाख कर्मचाऱ्यांना मिळणार इंशुरन्सची सेवा

-प्रत्येक गरिबाला ३ महिने ५ किलो अन्नधान्य मोफत. गरिबांच्या खात्यात थेट पैसे जाणार. अर्थमंत्र्यांची घोषणा

-शेतकऱ्यांना महिना २ हजार रुपयांची मदत

-मनरेगाच्या ५ कोटी मजुरांना योजनेचा लाभ

-विधवा, दिव्यांगांना १ हजार रुपये देणार. अर्थमंत्र्यांची घोषणा. ३ कोटी वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना मदत.

-अर्थमंत्र्यांकडून जनधन खातेधारक महिलांसाठीही मदतीची घोषणा

-नागरिकांनी विशेषत: गरीबांनी अन्न, धान्य आणि गॅस अर्थात इंधन पुरवठ्याची चिंता करु नये.

-उज्वला योजनेअंतर्गत ३ महिने मोफत गॅस सिलेंडर मिळणार

सर्व घोषणा पाहता देशातील एक मोठा वर्ग असणाऱ्या गरीब वर्ग आणि शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)