कोरोना योध्यांसाठी मदतीचा हात....

1

पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने देशभरात संचारबंदी अर्थात लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या महामारीशी लढण्यासाठी आरोग्य व नगरपालिका विभागाचे अधिकारी, रॉबिन हूड संस्था,स्वच्छता कर्मचारी,कमांडोज आणि पोलिस आपल्या जीवाचे रान करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन तर केले आहे.
      पंढरपूर मधील असे सामाजिक बांधिलकी दाखवत श्री. सुरज खंडेलवाल, श्री.राकेश खंडेलवाल, श्री.अजय खंडेलवाल यांनी करोना साठी ड्युटी वर असलेले पोलीस, ट्रॅफिक पोलीस, रस्ते सफाई कामगार, कमानडो, रॉबिन हूड संस्था यांना घरचा चहा, माझा ज्युस, Kinkey पाणी बॉटल, सॅवलाॅन हँड वॉश, सॅवलाॅन साबण या वस्तू  पंढरपूर तर्फे वाटप करण्यात आले व या कोरोना सारख्या भीषण आपत्तीशी लढताना आपण सामाजिक बांधिलकी जपत आहेत या बद्दल त्यांचे आभार मानले

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा