पुढील काही काळ परिक्षेचा ......विवेक परदेशी आरोग्य समिती सभापती नगरपरिषद पंढरपूर

0

           शाळेच्या परिक्षेत आपण उत्तीर्ण झालो. कॉलेज च्या परिक्षेत आपण उत्तीर्ण झालो. जिवनाच्या परिक्षेत यशस्वी झालो असेल. पण या कोरोना च्या परिक्षेमध्ये आपल्या परिवाराला सुरक्षीत ठेवण्यामध्ये आपण उत्तीर्ण होणार का? यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे, हिच परिक्षा खुप महत्वाची आहे. कारण या परिक्षेत चुकीला माफी नाही. ईतर ठिकाणी आपणास अपयश आले तरी आपण भविष्यात ते अपशय पुसुन यशात रुपांतर करु शकतो. पण आपल्या स्वतःच्या निष्काळजी पणा मुळे कोरोनाच्या परिक्षेत अपयशी झालो तर आयुष्यात आपण काय मिळवले व काय गमावले याचा हिशोब करता येणार नाही. जिवंत जरी राहीलो तरी पश्याताप करण्या शिवाय आपल्या आयुष्यात काहीच राहणार नाही. आपल्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्या परिवाराला, मित्रजनांना ,ज्ञात व अज्ञात व्यक्तीला त्रास झाला तर आपलेच लोक आपल्याला माफ करतील का? याचाही विचार करण्याची वेळ आली आहे.
             आपल्या घरात अनेक सदस्य असतात. पण जर एक सदस्य घरातील आजारी झाला , दवाखान्यात अॅडमिट करावे लागले. सर्व कुटुंबाला मेहनत घ्यावी लागते. कोणी त्यांच्यासाठी जेवण करतो, कोणी दवाखान्यात काळजी घेते कुणी दुपारी , कोणी सायंकाळी , कोणी रात्री मुक्कमाला दवाखान्यात थांबावे लागते. सर्व कुटुंब डिस्टर्ब होते. आपणच देवाला प्रार्थना करतो हा दवाखाना आयुष्यात परत नको. कधी एकदा दवाखाना संपतो असे आपल्याला वाटते.
         घरातील एक व्यक्ती आजारी पडला तर ईतके समस्या , मग तुम्हीच विचार करा. कोरोना मुळे एकाच वेळी घरातील सर्व सदस्य आजारी पडले तर काय होईल. आपल कल्पना करु शकणार नाही .आपले मित्र मदतीला येतील की नाही सांगता येणार नाही. त्यांचीही काही चुक नाही त्यांना हि कोरोना परिक्षेत यशस्वी होऊन, त्यांच्या परिवाराचे रक्षण करायचे आहे. तुम्ही केलेल्या निष्काळजीपणा मुळे ईतर लोकांनी त्याच्या कुटुंबातील लोकांचा जिव धोक्यात का घालतील? सांगली जिल्ह्यात एकाच घरातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण झाली असे पेपरला वाचले. 
          फालतु गोष्टीत वेळ न घालवता, आज प्रत्येक सुक्ष्म गोष्टींचा आभ्यास करुन, जर काळजी घेतली निच्छीतच आपण कोरोनाच्या परिक्षेत यशस्वी होऊ. 
           आज इटली, अमेरीकेत व ईतर देशात दररोज कोरोना मुळे हजारो लोक मॄत्युमुखी पडत आहेत,  पण बरेच लोग जिवंतही आहेत , निरोगी आहेत.
 *त्यांचे कारण काय असावे?* 
 *याचा विचार आपण केला का?* 

             त्यांचे कारण म्हणजे त्यांनी वेळीच काळजी घेतली, शासनाच्या आदेशाची थट्टा न करता, शासनाला फसवण्याचा प्रयत्न न करता,  आपल्या कुटुंबाचा, मित्र परिवाराचा विचार करुन कितीही त्रास झाला तरी गांभिर्याने ते आदेश पाळले आहे , कित्येक दिवस झाले ते घरातच आहे, घरीच थांबलेत, अजुनही घरीच राहत आहे , त्यांची परिक्षा अजुन चालुच आहे किती दिवस असे चालणार त्यांनाही माहीत नाही. त्यांनी धिर सोडला नाही.  ते जिवंतच आहेत, सुरक्षीत आहेत, ते कोरोनाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणार असा त्यांना विश्वास आहे. 
          आपण भारतीय नागरिक ईतर लोकांचे अनुकरण करण्यात पटाईत आहोत. परदेशातील लोकांकडुन घडलेल्या चुका लक्षात घेऊन , त्यांच्यातील काही लोक कसे सुरक्षीत राहीले याचा अभ्यास करुन त्यांचेअनुकरण का करायचे नाही. आपण काळजीने का नाही घ्यायची.
         अजुनही वेळ गेलेली नाही, वेळीच जागरुक व्हा. आपणासच आपल्या पुर्ण परिवाराची काळजी ध्यायची आसुन, पुढील काही दिवस घरात जे आहे त्याचे सेवन करुन अजिबात घर सोडायचे नाही असे वचन सर्व कुटुंबीय मिळुन घेणे आवश्यक आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)