पुुणे- कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राहणारे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
परराज्यातून पुण्यात नोकरी, काम धंद्यानिमित्त आलेल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे, यात उत्तर भारतातील नागरिकही आहेत, सध्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुण्यातील शाळा महाविद्यालयांसह खाजगी क्षेत्र तसेच बाजारपेठाना 30 मार्च पर्यन्त बंद ठेवण्याचे आदेश आहेत. पुणे इथे विविध क्षेत्रातील अनेक लोक काम करतात . पुणे शहरातून बाहेर जाणाऱया ट्रॅव्हलस अँड बस बंद केल्या मुळे संपूर्ण भर हा रेल्वे वर पडल्या मुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली आहे . पोलीस प्रशासनाचे गर्दी कमी करायचे प्रयत्न सुरु आहेत.
उत्तर भारतातील नागरिक आपल्या मूळ गावी जाण्यासाठी गर्दी करताहेत.

