राष्ट्रवादी पंढरपूर शहर अल्पसंख्यांक सेलच्या शहराध्यक्षपदी नासीर बागवान यांची निवड

0
पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेस प्रणित अल्पसंख्यांक सेलच्या पंढरपूर शहराध्यक्ष पदी नासीर बागवान यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र त्यांना आमदार भारत भालके यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सदैव सर्व सामाजिक व धार्मिक घटकांना सोबत घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसचे विचार तळागाळात आणखी सक्षमपणे पोहोचविण्याचे काम नूतन शहराध्यक्ष नासीर बागवान हे करतील असा विश्वास यावेळी आमदार भारत भालके यांनी व्यक्त केला. 
      या निवडीनंतर बोलताना नूतन शहराध्यक्ष नासीर बागवान म्हणाले कि,आ.भारत भालके,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष फारूक मटके यांच्या मार्गदर्शनाखाली आपणावर सोपविलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पडणार असून पंढरपूर शहरात राष्ट्रवादी कॉग्रेस बळकट कारण्यासाठी परिश्रम घेणार आहे.           
     हे निवडीचे पत्र प्रदान करताना रौफ बागवान,जमीर बागवान,बशीर बागवान,इम्तियाज बागवान,मोहसीन बागवान,तेजस दांडगे,अमीर बागवान आदी उपस्थित होते.       

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)