सार्वजनिक ठिकाणी थुंकु नयेे पोलिस प्रशासना द्वारे आवाहन

0
पंढरपूर :
कोरोना विषाणूचा फैलाव आज जगभरात मोठ्या प्रमाणात होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने या विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता
जास्त आहे. या गोष्टी लक्षात घेऊन सतर्कतेचा पर्याय म्हणून पंढरपूर
परिसरातील व उपनगरातील सर्व टपरी,मावा विक्रते यांची दुकाने बंद ठेवण्यात
आली असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल
असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
      सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारचे व्यसन करून सार्वजनिक ठिकाणी
थुंकु नये असे आवाहन पोलिस प्रशासना द्वारे करण्यात आले आहे. 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)