पंढरपूर : कोरोना विषाणुच्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूला पंढरपूर शहरात व उपनगरात सकाळी सहा वाजताच सुरुवात झाली. सकाळी व्यायाम, मॉर्निंग वॉक व फिरायला येणाऱ्या लोकांनी घराबाहेर येणे टाळले. दिवस उजाडताच रस्त्यावर गर्दी दिसून न आल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. त्यामुळे सकाळी शुकशुकाट पाहवायास मिळाला
दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे मात्र आदेशानंतरही ज्यांनी दुकाने वा आस्थापने बंद ठेवली नाहीत, ती बंद करण्यास पोलिसांनी भाग पाडले.
रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी स्वयंस्फूर्त असेल, यात वाद नाही.

