एसीचा वापर कमी करावा- आरोग्य मंत्री राजेश टोपे

0
मुंबई : थंड हवेत व थंडीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचं आयुर्मान अधिक असतं. त्यामुळे इतरांना त्याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कडक उन्हात या व्हायरसचं आयुर्मान कमी असतं, त्यामुळे नागरिकांनी एसीचा वापर कमी करावा, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सुचनांद्वारे याची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे. या सूचनांचा नागरिकांनी अवलंब करून या राष्ट्रीय आणीबाणीत आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असंही आवाहन टोपे यांनी केलं आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)