पंढरपूर : संपूर्ण देशामध्ये कोरोना व्हायरस या विषाणूचा संसर्गाचा आजार बळावतो आहे दिवसेंदिवस त्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते आहे, पण ही साखळी कुठेतरी ब्रेक झाली पाहिजे या दृष्टिकोनातून भारताचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांनी स्वत:वरती काही बंधनं घालून घ्यायचा स्वयंम संयम पाळायचा या उद्देशाने जनता करफ्युचे आवाहन केलेले आहे सकाळी सात ते संध्याकाळी रात्री नऊपर्यंत माणसाने स्वतःला इतरापासून आयसोलेट करावं व आपल्या कुटुंबाला आयसोलेटेड करावं आणि ही विषाणूची साखळी कुठेतरी ब्रेक करावी, हा विषाणू 12 तासापर्यंत जिवंत रहातो. तुम्ही 14 तास समाजापासून लोकांपासून वेगळे राहिला तर तो विषाणु मृत होतो.
हे सायन्सने सांगितलेले आहे.त्याच उद्देशाने या जनता कफ्युचे आवाहन केले आहे. त्याला तमाम सगळ्या पंढरपूर करानी ग्रामीण भागातील लोकांनी,सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्या लोकांनी त्याला सहकार्य करावे व साथ द्यावी असे आवाहन त्यानिमित्ताने करतो. त्याचबरोबर नगरपालिका महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी असतील दवाखान्यातील डॉक्टर असतील, नर्सेस, इतर स्टॉफ असेल शासकीय कर्मचारी असतील तर अजून जिल्हा प्रतिनिधी असलेल्या सगळ्यांकडून तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत आपण त्याचे तंतोतंत पालन करावे आणि हे काम करणारे जे दुत आहेत, सेवक आहेत त्यांच्या आदर करण्यासाठी म्हणून उद्या सायंकाळी पाच वाजता आपल्या येथे सायरन वाजेल त्यावेळेस पाच मिनिटं आपल्या घरामध्ये घरा समोर उभा राहून, बाल्कनीमध्ये उभा राहून घंटानाद करून त्याचे ऋण व कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपणास मिळणार आहे त्यानिमित्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे यासाठी मी आवाहन करतो.

