मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्यात (SSC Board exam postponed) आला आहे. 23 मार्चला होणारा भूगोल विषयाचा पेपर आता 31 मार्चनंतर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतचा निर्णय घेतला. याआधी पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय वर्षा गायकवाड यांनी कालच जाहीर केला होता. (SSC Board exam postponed)
इयत्ता 10 वी परीक्षेचा सोमवार दिनांक 23 मार्च रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आला आहे . रद्द करण्यात आलेल्या पेपरची पुढील तारीख 31 मार्च नंतर जाहीर करण्यात येईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
'नियोजित वेळापत्रकानुसार, दहावी बोर्डाचा भूगोल विषयाचा पेपर 23 मार्चला होता. मात्र सध्याची परस्थिती पाहता, हा पेपर 31 मार्चनंतर घेण्यात येईल' असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
दहावी बोर्डाचा शेवटचा पेपर राहिला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला 3 मार्चपासून सुरुवात झाली आहे. 3 मार्च ते 23 मार्च 2020 या कालावधीत ही परीक्षा नियोजित होती. मात्र राज्यात कोरोनाचं थैमान पाहता, शेवटचा पेपर लांबणीवर टाकला आहे.

