पंढरपूर : दि.20 मार्च 2020 रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरीकांनी भिती बाळगू नये. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सूचना पाळून स्वत:ची काळजी घ्यावी व घराबाहेर पडू नये. तसेच जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशान्वये 20 मार्च ते 31 मार्च 2020 या कालावधीत जीवनाश्यक वस्तू,औषधे, फळे, भाजीपाला वगळून इतर गर्दी होणारे दुकाने बंद करण्यात येणार असल्याचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे.
याच गोष्टीची अमंलबजावणी करताना आज पंढरपूर वासीय दिसून आले. पंढरपूर शहारातील विविध भागात आज जीवनाश्यक वस्तु सोडून इतर दुकाने आज ग्राहकांसाठी बंद ठेऊन दुकान मालकांनी अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आहे.
तसेच पंढरपूरात श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर बंद असल्या कारणाने आज द्वादशी असूनही रेल्वे स्टेशन परिसरात शुकशुकाट दिसून आला. तसेच रेल्वे प्रशासन बाहेरून येणार्या गाड्याची स्वच्छता ही चोख करत असल्याचे दिसून आले.
एकूणच हे सर्व दृष्य पाहता पंढरपूरकरांनी कोरोना वायरस शी दोन हात करून कोरोनाला मुळा सकट उपटून टाकायचे ठरवले आहे असे दिसून आले.

