घाबरून जाऊ नका . जाणून घ्या काय बंद असेल आणि काय चालू असेल लॉक डाउन मध्ये ...

0
रेशन दुकाने राहणार सुरु
औषध दुकाने
पोलिस ठाणे
शाळांच्या परीक्षांचे काय होणार? 
फक्त 10 वी चे पेपर होतील
बस सेवा सुरुच राहणार
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने अनेक मार्गावरील एसटी बसची संख्या कमी केली आहे. मात्र, सेवा अद्याप बंद केलेली नाही. या काळात या एसटी बसेस आवश्यकत्या संख्येत आणि आवश्यक मार्गावर चालूच राहणार आहे. तसेच ज्या शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे, तेथील बस सेवाही चालू राहणार आहेत. 
लोकल, रेल्वे सेवा सुरु राहणार 
लांब पल्याच्या अनेक रेल्वे गाड्या रेल्वेकडून बंद करण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या मार्गावर रेल्वे सेवा सुरळीत चालू आहे. त्यामुळे रेल्वेची ही सेवा या काळात चालू राहणार आहे.
सरकारी कार्यालये राहणार सुरु
 सरकारी कार्यालये सुरु राहणार आहेत. पण राज्यसरकारने २५ टक्के कर्मचारी रोज काम करतील असा आदेश लागू केला आहे. पण या काळात नागरिकांनी आपली सरकारी कार्यालयांमधील आवश्यक कामे टाळावीत.
फळ-भाजी मार्केट राहणार सुरु
फळे, भाजी, दुध या सर्व जीवनावश्यक गरजेच्या वस्तू आहेत. या लोकांना दरोरज लागणाऱ्या गोष्टी आहेत. ही ठिकाणी बंद राहणार नाहीत. त्यामुळे याबाबत जनतेने न घाबरता स्वत:ची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे.
पेट्रोल पंप राहणार सुरु
पेट्रोल पंपही सुरु राहणार आहेत. पण, लोकांनी बाहेर न पडता होता होईल तेवढे घरी रहावे. आवश्यकता भासली तरच बाहेर जावे अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

मार्केट राहणार बंद
मोठमोठे मॉल्स, मार्केट, दुकाने ही या काळात बंद राहणार आहेत. कोरानाच्या विषाणुंचे संक्रमण टाळण्यासाठी गर्दी होण्यापासून प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. ज्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर सर्व ती दुकाने बंद राहणार आहेत.
केव्हापर्यंत राहणार बंद
३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात येणार आहेत. लॉकडाऊन हा तूर्तास ३१ मार्चपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)