पुढे त्यांनी सांगितले आहे की, 'बऱ्याच काळापासून मी ऐकतोय की, माझ्या किंवा माझ्या कंपनीच्या नावाने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ऑडिशन सुरु असतात. त्यावर काहीतरी इलाज करायचा असं बरेच दिवस डोक्यात होतं. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की, मी कधीही अशा प्रकारची ऑडिशन घेत नाही. पण आता पहिल्यांदा मी ऑनलाईन ऑडिशनचे आवाहन करतोय. तुम्ही कोणत्याही वयातले असाल, तुम्हाला अभिनयाची आवड असेल, तुमचं अभिनयाचं शिक्षण झालं असेल तर तुम्हाला आवडतील ते डायलॉग्ज, आवडेल तो परफॉर्मन्स आम्हाला मोबाईलवर शूट करुन पाठवा, सोबत तुमची माहिती, तुमचे फोटो, संपर्क क्रमांकही पाठवा. यासाठी ई-मेल आयडी आहे - talentbank2020@gmail.com माझी टीम (जी सध्या घरीच बसलेली आहे) ते या माहितीचे संकलन करतील. तुमचं नाव आमच्याकडे रजिस्टर केलं जाईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. आपला, महेश मांजरेकर.'
अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना एक मोठी सुवर्णसंधी - महेश मांजरेकर
मार्च २१, २०२०
0
जगभरात कोरोनाचा हाहाकार पसरला आहे. तर दिवसेंदिवस भारतातील कोरोनाचा आकडा वाढतच आहे. यादरम्यान सर्व कलाकार 'वर्क फ्रॉम होम' काम करत आहेत. तर सध्या अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबत चित्रपटात काम करायला मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन ऑडिशन घेण्यात येणार असल्याची माहिती स्वत: महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियावरून दिली दिगदर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या फेसबुकवर लिहिले आहे की, 'नमस्कार, मी महेश मांजरेकर. सध्या कोरोनामुळे सर्व शूटिंग्ज बंद आहेत. नाटकांचे प्रयोग थांबलेले आहेत. मीसुद्धा घरी बसूनच पुढील सिनेमाचे लिखाण करत आहे. एकूण सगळीकडेच 'वर्क फ्रॉम होम' सुरु आहे. काही मित्रांशी बोलत असताना असं लक्षात आलं की, घरी बसून करायचं काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. कदाचित तुम्हालाही पडला असेल. म्हणून मग एक विचार आला तुम्हाला एक ॲक्टीव्हीटी द्यावी.'
Tags

