कोरोना मुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळं लोक घरातचं बंद झाले आहेत. अशा वेळेस अनेक लोक हे घरातुनच काम करत आहेत. तसेच अशा परिस्थितीत जगाशी संपर्क साधण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. याचा परिणाम इंटरनेट स्पीडवर होत आहे. इंटरनेटवर वाढलेला लोड कमी करण्यासाठी युट्यूब, नेटफ्लिक्स यांसह अनेक वेबसाइटनं कमी रिझोल्यूशनमध्ये सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. दरम्यान, आता व्हॉटसअॅपनेही त्यांच्या एका फीचरमध्ये मोठा बदल केला आहे. भारतीय युजर्सवर हे निर्बंध असून आता स्टेटसला फक्त 15 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करता येणार आहे.
WABETAinfo ने व्हॉटसअॅपमध्ये झालेल्या बदलांची माहिती दिली आहे. यामुळे युजर्सना 15 सेकंदापेक्षा जास्त वेळेचा व्हिडिओ स्टेटसला शेअर करता येणार नाही. याआधी स्टेटसला 30 सेकंदापर्यंतचा व्हिडिओ ठेवता येत होता.
याआधी जेव्हा व्हिडिओ स्टेटसला ठेवता यायचा तेव्हा व्हिडिओतील हवा तेवढा भाग पोस्ट करता येत होता. मात्र आता कोणताही व्हिडिओ पोस्ट केलात तरी त्याचे फक्त 15 सेकंदच दिसतील.