मोठी बातमी : घरगुती विजेच्या वापरात 5 ते 7 टक्के, व्यावसायिक दरात ते आणि औद्योगिक वीज दरात होणार कपात

0
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसनं सगळीकडं थैमान घातलं असल्यानं सर्वच जनता हैराण झाली आहेत. मात्र, त्यातच राज्य सरकारनं राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्याच्या वीज नियामक आयोगानं राज्य शासनाच्या तिजोरीवर कोणताही एक्सट्रा भार पडू न देता कमी दरानं वीज देण्याचं नियोजन केलं आहे. याबाबत वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
      घरगुती विजेच्या वापरात 5 ते 7 टक्के, व्यावसायिक दरात 10 ते 12 टक्के आणि औद्योगिक वीज दरात 10 ते 11 टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. हे दर 1 एप्रिल 2020 पासून लागू होणार असल्यानं ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे.दरम्यान, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून वीज वितरण कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत की, वीजबिल भरण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणावी. सध्याच्या काळात वीजबिल भरणे शक्य नसेल, तर काळजीचे काही कारण नाही. तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही तसेच 3 महिन्यांमध्ये वीज कापली जाणार नाही

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)