कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर मध्ये सर्व नगरसेवक, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांची बैठक घेवुन आमदार प्रशांत परिचारक यांनी कोरोना संसर्गावर उपाययोजना करणेचे मार्गदर्शन केले.
करोना संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पंढरपूर शहरामधील परदेशातुन, परराज्यातून व  मुंबई, पुणे,नागपूर आदी भागातून नोकरीसाठी,शिक्षणासाठी व मजुरीसाठी जे बाहेर गेलेले नागरिक व विद्यार्थी पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले याचा आढावा घेण्याची सुचना केली. नगरपालिकेकडे अपुरे कर्मचारी असल्यामुळे नगरपालिकेने समाजातील सामाजिक काम करणारे समाजसेवक, स्थानिक नगरसेवक,स्वयंसेवक यांची मदत घेवुन एक टिम तयार करून बाहेरून आलेल्या नागरिकांची नोंद घेवुन त्यांना त्यांच्या घरातून बाहेर न येण्याच्या सुचना द्याव्यात व त्यांनी समाजापासून व आपल्या कुटुंबियापासून एकटे रहावे अशा प्रकारे त्यांचे प्रबोधन करावे.
पंढरपूर शहरामध्ये प्रत्येक प्रभागातील रस्त्यांवर, बंद दुकाने, रिकाम्या जागेवर व नागरिकांच्या घरावर व घरांच्या भिंतीवर ब्लिचींग पावडर फवारण्याचे नियोजन करण्याच्या सुचना आमदार प्रशांत  परिचारक यांनी आरोग्य विभागास दिल्या.
तसेच पंढरपूर शहरामध्ये भाजी घेण्यासाठी भाजी मंडई मध्ये खुप मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावर उपयोजना कराव्यात जेणेकरून भाजी विक्रीसाठी गर्दी होणार नाही. नसेल तर पंढरपूर शहरामध्ये स्थानिक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामध्ये भाजी विक्री व दुध विक्रीचे स्टॉल उभारण्यासाठी जागा
उपलब्ध करून स्टॉल उभा करण्यास मदत करावी, जेणेकरून भाजी मंडईमध्ये नागरिकांची गर्दी होणार  नाही. त्यामुळे नागरिकांची सोय होईल. प्रत्येक प्रभागात नगरसेवकांनी १० स्वयंसेवक नेमुण त्यांना दैनंदिन सर्वेक्षणासाठी निवड करावी. या सदस्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये एका टिमने १०० घरांचे रोज सर्वेक्षण करावे. स्वयंसेबकासोबत अशा सेविका अथवा त्याच प्रभागातील स्वच्छता कर्मचारी यांची टिम तयार करणे सदर टिमने हस्तपत्रिका वाटप साथ रोग (करोना) आजारासंबंधी नागरिकांमध्ये प्रबोधन करावे. प्रत्येक साथ रोग नियंत्रण पथक किंवा टिमजवळ मार्गदर्शक पुस्तिका देण्यात यावी, जेणेकरून
नागरिकांच्या सर्व शंकेचे निरसन होईल.
याबैठकीस पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, सर्व नगरसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 
  