रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील या प्रयोगशाळांना कोरोना तपासणीसाठी तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. दररोज प्रत्येकी १०० नमुने तपासण्याची या चाचणी केंद्रांची क्षमता आहे. काही तांत्रिक गोष्टी पूर्ण होताच या प्रयोग शाळांमधूनही करोनाची चाचणी उपलब्ध होणार आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत सध्या केवळ नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना तपासणी करण्यात येते आणि याची क्षमता १०० तपासण्याचीच आहे.
रिलायन्स इंडस्ट्रिकडून कोरोना व्हायरसविरोधात मुख्यंमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतीत भर म्हणून रिलायन्सने ५ कोटींची मदत जाहिर
मार्च २४, २०२०
0
कोरोनासाठी राज्यकडे पुरेसा निधी आहे अशी माहिती काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रिकडून कोरोना व्हायरसविरोधात मुख्यंमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतीत भर म्हणून रिलायन्सने ५ कोटींची मदत जाहिर केली आहे. तसेच, रोज १ लाख मास्कही पुरवण्यात येणार आहेत. रिलायन्सने महानगरपालिकेसोबत सेव्हन हिल्स रुग्णालयात १०० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार केला आहे. तसेच, रिलायन्सकडून अनेक एन.जी.ओला जेवन पुरविले जाते.
Tags

