पुणे - करोनाचा सामना करण्यासाठी देशासह राज्यात हायअलर्ट ठेवण्यात आला आहे. सोमवार दि.23 राज्यात लॉकडाऊन जाहीर करत कलम 144 म्हणजे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. यानंतर काही लोक विनाकारण घरातून बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले.
लोक घरात न थांबता स्वत:ची काळजी न घेता रस्त्यांवर येत आहेत, विनाकारण गर्दी करत आहेत. हे निदर्शनास आल्यावर आज (सोमवारी) 4 वाजता राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली. तसेच सर्वच जिल्ह्यांचा सीमाबंदी करण्याचा आदेश दिला आहे
प्रत्येक सीमेवर पोलिसांचा कडा पहारा आहे. पण, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहणार आहे. आवश्यक गरजेवेळी व जीवनावश्यक वस्तू

