खबरदार...... घरातून बाहेर पडताना विचार करा होऊ शकते कारवाई

0
पंढरपूर (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरस चा प्रसार पाहता हा प्रसार थांबवण्यासाठी मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यतील  नागरी प्रभागात कलम १४४ अनुवये जमावबंदी लागु केलेले असुन. ५ पेक्षा अधिक व लोकानी जमाव करून  या जमावबंदीचे उलघन केल्यास कलम १४४ अनुवये कठोर कारवाई केली जाईल.काल जनता कर्फ्युचे पालन न करणाऱ्या नागरिकांनवर मोटार व्हेइकल व पोलीस कायदा या अनुशघाने कारवाई करण्यात आली या पुढे ही अशा कठोर कारवाई करण्यात येतील.

ग्रामीण भागात जरी १४४ कलम लागु नसेल तरी मा.जिल्हाधीकारी यांच्या आदेशानुसार नुसार सर्व प्रकारची दुकाने व अस्थापने बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. (अत्यावश्यक सुविधा वगळता)

तरी नागरिकानी शासनाने दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करावे. कोरोना व्हायरस चा प्रसार हा जनसंपर्कातून होत असल्या कारणाने जास्ती जास्त घरी रहावे.अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर पडावे असे आदेश व सुचना पढरपूर उपविभागीय पोलिस निरीक्षक डॉ.सागर कवडे यांनी दिली
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)