आज आपण पाहतोय या कोरोना नामक रोगामुळे अनेक मंदिरे बंद करण्यात आली आहेत .त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील तमाम वारकरी व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आपल्या पंढरीरायचे मंदिर हि बंद करण्यात आले आहे , हे आपल्या सर्वांच्या हिताकरिताच आहे , असा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
आज आपण पाहतो ४०० वर्षांपूर्वीपासून हा वारी सोहळा परंपरागत चालू आहे, त्याच ४ प्रमुख यात्रांपैकी चैत्री वारी ( यात्रेला ) खुप महत्त्व आहे पण सध्य परिस्थिती पाहता
" ठाईची बैसोनी करा एक चित्त ।
"आवडी अनंत आळवावा।।
अशी वेळ आपल्यावर आलेली आहे म्हणुन मी वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून आपणा सर्वांस विनंती करतो हा होणार चैत्री सोहळा रद्द करण्यात आला आहे .भगवंताचे नित्य-नियम परंपरागत चालूच राहणार आहेत त्याची चिंता नसावी आज सद्य परिस्थितीस घरी बसून कोरोनावर मात करणे हीच वारी समजुन कोणीही वारीसाठी पंढरपुरला येऊ नये .आपण सरकार , पोलीस कर्मचारी व डॉक्टर यांना सहकार्य करून हा चैत्री सोहळा घरी बसुन पार पाडू .
पांडुरंग परमात्मा या संकटाला लवकर दूर घालाव व देशावरील संकट दूर कर असे साकडे देवाला घालूया.असे शिवश्री.ह.भ.प.अच्युत मारुती गुरव अध्यक्ष छावा क्षात्रवीर सेना वारकरी आघाडी पश्चिम महाराष्ट्र यांनी छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र राज्य यांचे तर्फ़े वारकरी संप्रदाय ला आवाहन केले.

