आर्थिक मदत करण्यात अक्षय कुमारने सर्वांनाच टाकले मागे ........पाहा कोणत्या स्टार नी किती मदत केली.....

0
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. प्रत्येक जण या महामारीपासून वाचण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहेत. सरकारदेखील विविध योजनांची अंमलबजावणी करत असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहे. यामध्येच काही सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना नावाच्या संकटाशी लढा देणा-या देशातील लोकांसाठी अभिनेता अक्षय कुमारदेखील दानवीर म्हणून पुढे आला आहे. अक्षयने कोरोनोव्हायरसशी लढण्यासाठी एक नाही दोन नाही तर चक्क २५ कोटी रुपये दान केले आहेत. फक्त रील लाइफच नव्हे तर ख-या आयुष्यातही खिलाडींयों का खिलाडी आहे अक्षय कुमार हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटी आपपल्या परिने कोरोनाशी लढण्यासाठी मदत करत आहेत. दाक्षिणात्य कलाकारांमध्ये बाहुबली फेम अभिनेता प्रभास याने चार कोटी रुपयांची देणगी गरजूंसाठी दिली आहे. तर सुपरस्टार पवन कल्याण याने सहाय्यता निधीला 2 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर महेश बाबू या कलाकाराने 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा राम चरण तेजा या दोघांनीही अनुक्रमे एक कोटी आणि 70 लाख रुपयांची देणगी गरजूंसाठीच्या निधीला दिली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे थलैवा अशी ओळख असणाऱ्या अभिनेता रजनीकांत यांनी तमीळ चित्रपटसृष्टीची मातृसंस्था असलेल्या फिल्म एम्पलॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेला 50 लाख रुपये देणगीस्वरूप देण्याची घोषणा केली आहे. तर अभिनेता कमल हासन यांनी आपलं स्वतःचं घर जनतेसाठी खुलं केलं असून पीडितांसाठी तात्पुरत्या स्वरुपाचं रुग्णालय म्हणून ते वापरात येत आहे.तर कपिल शर्मानं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये कपिल शर्मा म्हणतो, 'ही वेळ सोबत उभं राहण्याची आहे ज्यांना आपली गरज आहे त्यांना साथ देण्याची आहे. पीएम मोदी रिलीफ फंडासाठी 50 लाख रुपये देत आहे. सर्वांना विनंती आहे की, घरीच रहा. सुरक्षित रहा.हृतिकनं महाराष्ट्र शासनाला २० लाखाची आर्थिक मदत केल्याची माहिती आहे. मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ही मदत वापरण्यात येणार आहे.तसेच हेमा मालिनी यांनी 1 करोड रुपये पी एम रिलीफ फंड ला दिले . सानी देवल यांनी 50 लाख रुपये पी एम रिलीफ फंड ला दिले
         मात्र आर्थिक मदत करण्यात अक्की अक्षय कुमारने सा-यांनाच मागे टाकले आहे. सर्वाधिक रक्कम निधीत देणारा अक्की हा पहिली अभिनेता ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)