'कोविड 19 चे संकट हे आपल्यासमोरील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूह कंपनी पूर्वीही गरजेवेळी देशाच्या कामी आली आहे. पण, या क्षणी जी गरज आहे ती नेहमीपेक्षा सर्वात जास्त आहे.', असं ट्विट रतन टाटा यांनी केलं. यासोबत त्यांनी एक फोटोही पोस्ट केला.
टाटा ट्रस्ट फ्रंटलाइनवर काम करत असलेल्या सर्व आरोग्य कर्मचारी, टेस्टिंग किट, संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी अधिक व्यवस्था आणि (Tata Group 500 Crore Help) आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगसाठी 500 कोटी रुपये देईल. टाटा ट्रस्ट या महामारीला लढा देत असलेल्या त्या प्रत्येकाचा सन्मान करते, असंही टाटा ट्रस्टने सांगितलं.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वसामान्य लोक मदत करत आहेत. तर काही व्यावसायिक, सेलिब्रिटीही आर्थिक मदत करत आहेत.

