रेल्वे प्रवाशांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले.सर्व लॉकडाऊन होत असल्यामुळे महानगरांमधून गावी जाणाऱ्या लोकांनी रेल्वेमध्ये मोठी गर्दी करत आहेत.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं आतापर्यंतचा सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. मध्यरात्रीपासून देशात एकही रेल्वे धावणार नाही. देशातील अन्यधान्य आणि इतर वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी मालवाहतूक मात्र सुरू राहणार आहे.
31 मार्चपर्यंत देशातील प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात मुंबईतील लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत 31 मार्चपर्यंत एकही लोकल धावणार नाही.

