कोरोना वायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग 16 मध्ये औषधाची फवारणी.पहा व्हिडीओ कसे होते निरजंर्तुकीकरण

0

पंढरपूर : पंढरपूरातील प्रभाग क्र 16  मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेतर्फे संपुर्ण प्रभागात औषधाची फवारणी करण्यात आली.  यावेळी नगरसेविका सौ.रेणुका धर्मराज घोडके  स्वत: समाजसेवक धर्मराज (तम्मा) घोडके यांनी मार्गदर्शन करून संपुर्ण प्रभागात जनजागृती केली. तसेच नवीनच झालेल्या अपार्टमेंट मधुनही फवारणी करण्यात आली. यावेळी लोकांनी घराबाहेर पडु नये, आपली व आपल्या कुटुंबाची घ्यावी असे सांगितले.
     नुकतीच नगरपालिकेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाची मिटींग आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी सर्व नगरसेवकांना आपआपल्या वॉर्डात औषध फवारणी करावी. प्रभागातील सर्व नागरिकांनी कोरोना रोगांची माहिती द्यावी. असे सांगितले होते.
यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,अध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले व सर्व नगरसेवक उपस्थित होते. या अनुषंगानेच प्रभाग 16 मध्ये औषध फवारणी करण्यात आली. यावेळी संपुर्ण प्रभागातील लोकांनी सहकार्य केले.

  
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)