पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूरातील प्रभाग क्र 6 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेतर्फे संपुर्ण प्रभागात औषधाची फवारणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका शकुंतला नडगिरे यांनी स्वत: मार्गदर्शन करून संपुर्ण प्रभागात जनजागृती केली.नुकतीच नगरपालिकेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाची मिटींग आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी सर्व नगरसेवकांना आपआपल्या वॉर्डात औषध फवारणी करावी.
प्रभागातील सर्व नागरिकांनी कोरोना रोगांची माहिती द्यावी. असे सांगितले होते.
यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,अध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
या अनुषंगानेच प्रभाग 6 मध्ये औषध फवारणी करण्यात आली.यावेळी या प्रभागातील सचिन माने, संतोष साळुंखे पाटील, विशाल घोडके,शैलेश घोडके,महेश निर्मळे,गणेश कोले,बाळू कोले,लखन कोले,शौकत तांबोळी,सादिक शेख व तानाजी चौकातील सर्व नागरिक उपस्थित होते.



