कर्मयोगी पब्लिक स्कूलचा १० वी चा १००% निकाल
शेळवे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, दिल्ली (सी.बी.एस.ई) तर्फे घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील इयत्ता दहावीच्या परीक्षेत कर्मयोगी पब्लिक स्कूल, शेळवे मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
केंद्रीय मध्यामिक शिक्षण मंडळ, दिल्ली (सी.बी.एस.ई) तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल दिनांक १३ मे २०२५ सोमवार रोजी जाहीर झाला. यामध्ये कर्मयोगी पब्लिक स्कूल चा निकाल १००% लागला असून या परीक्षेत प्रताप साहेबराव नागटिळक याने ९६.२ % गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. पियुष सदाशिव गाजरे यास ९३ % गुण मिळवून प्रशालेतून द्वितीय क्रमांकाने तर यशराज दत्तात्रय शिरसट हा विद्यार्थी ९१ % गुण मिळवून प्रशालेतून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके, प्रशालेचे प्राचार्य श्री. सिबानारायण दाश तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.


