छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महेश नाना साठे यांच्या निधीतुन ऐतिहासिक बुरुज जतन व संवर्धन कार्याचा शुभारंभ

0

** पंढरपुरातील लक्ष्मी टाकळी येथे ऐतिहासिक बुरुज बांधकाम कार्याचा शुभारंभ *** सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून सरपंच संजय साठे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप  

पंढरपूर / - पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महेश नाना साठे यांच्या निधीतुन ऐतिहासिक बुरुज जतन व संवर्धन कामाच्या बांधकाम कार्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडले.या कार्यक्रमासाठी आमदार समाधान आवताडे, शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, युवक नेते प्रणव परिचारक, माजी जि.प सदस्य रामदास ढोणे उपस्थित होते.

 शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून व शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे यांच्या विशेष प्रयत्नातून निधी मंजूर झालेल्या पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरेचा ठेवा असलेल्या हुडा बुरुज जतन व संवर्धन बांधकाम कार्याचा शुभारंभ कार्यक्रम येथील हनुमान मंदिरासमोर बुधवारी मोठ्या दिमाखात पार पडला.

यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की लक्ष्मी टाकळी येथील ऐतिहासिक असलेल्या बुरुज बांधकाम करू त्याचे जिर्नोध्दार करण्याच्या चांगल्या निर्णयाचे मी सरपंच व ग्रामपंचायतीचे स्वागत करतो  पुढील काळात विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास देत. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल महेश नाना व सरपंच संजय साठे यांचे कौतुक केले.

  याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे म्हणाले की शासन स्तरावर प्रयत्न करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून टाकळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी खेचून आणला आहे. पुढील काळातही निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास दिला.

यावेळी बोलताना युवक नेते प्रणव परिचारक म्हणाले की लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत पंढरपूर शहरा लगत असल्याने इतर ग्रामपंचायतीप्रमाणे निधी दिला जातो मात्र हा निधी कमी पडत असल्याने गावची संख्या पाहता ज्यादा निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी महेश नानानी वेळोवेळी डिपीडीसीच्या बैठकीत प्रयत्न केल्याचा मी साक्षीदार आहे असे म्हणाले . सरपंच संजय साठे यांनी टाकळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले.

यावेळी टाकळी ग्रामपंचायत सरपंच संजय साठे यांनी प्रास्ताविकामध्ये बुरुज बांधकामाची रचना कशा पद्धतीने असेल याची माहिती दिली.  लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)