सेतूसंबंधीच्या तक्रारीसाठी नागरिकांना क्यूआर कोड वर तक्रार नोंदवण्याची सुविधा - प्रांताधिकारी सचिन इथापे

0

पंढरपूर :-  पंढरपूर उपविभागातील  पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र व  सेतू कार्यालयात दर्शनी भागात क्यू आर (QR)कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत,  संबंधित नागरिकांनी क्यु आर कोड स्कॅन करून यावर तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, यावरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यासंबंधी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील  सर्व महा ई सेवा केंद्र तसेच सेतू कार्यालय, तहसील कार्यालय  येथे क्यु आर कोड लावण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रचालकांनी दाखल्या साठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम मागणी केल्यास, दाखला विहीत मुदतीत दिला नाही अथवा विलंब केला तर, दाखल्या संदर्भात संबधिताला एसएमएस व्दारे माहिती न दिल्यास, एजंटाव्दारे संबधित नागरिकांकडे अधिकचे पैसे मागणी केल्यास अशा कोणत्याहीप्रकारच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी क्यु आर कोड स्कॅन केल्यास त्यावर तात्काळ आपली तक्रार नोंदविता येईल.

       नागरिकांनी क्यू आर कोड स्कॅन करून तक्रार नोंदवणीच्या दिलेल्या अद्यावत सुविधेचा लाभ घ्यावा असे  आवाहन  प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)