पंढरपूर येथे सर्व शाखीय सोनार समाजाचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा व समाज जागृती अभियान

0

 


पंढरपूर येथे २८ मार्च रोजी सर्व शाखीय सोनार समाजाचा राज्यस्तरीय सन्मान सुवर्णरत्नांचा सोहळा व समाज जागृती अभियान

 पंढरपूर प्रतिनिधी-- अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबेजोगाई व सर्व शाखीय सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७५ समाज रत्नाचा सन्मान व पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम शुक्रवार दि. २८ मार्च २०२५ रोजी  सकाळी १० वाजता आनंदीविनायक मंगल कार्यालय  पंढरपूर  वाखरी रोड पंढरपूर  येथे आयोजित करण्यात आला  असल्याचे संयोजक तथा सोनार समाज हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राजेशभाऊ पंडित रेणापूरकर यांनी माहिती दिली आहे.

   सर्व शाखीय सोनार समाजातील अनेक समाज रत्ने समाजाच्या भल्यासाठी तन मन धनाने कार्यरत आहेत, अशा ७५ सुवर्ण रत्नाचा सन्मान व पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष  अनिलशेठ धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष श्रीगोंदा, स्वागताध्यक्ष  सुभाष दादा वेदपाठक मोडनिंब, उद्घाटक श्रीनिवास बानकर इंदापूर, मार्गदर्शक शिवानंदजी टाकसाळे, समन्वयक  राजेद्र पारखे, समन्वयक  निलेशभैय्या धाराशिवकर, समन्वयक  माधवीताई पोतदार आदी मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीने सोहळा आयोजित केला आहे.

 सोनार समाजाच्या ऐकतेसाठी, समाज संघटनेसाठी, समाज बलवान व समृद्ध होण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज ओळखून दूरदृष्टी ठेऊन, समाजासाठी  सतत कार्यरत लढवय्ये संघर्ष यात्री नेते राजेशभाऊ पंडित रेणापूरकर यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केली आहे.तरी महाराष्ट्रातील सर्व  शाखीय सोनार समाज बांधवानी  कार्यक्रमास वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक  राजेशभाऊ पंडित रेणापूरकर व सोनार हक्क परिषदचे सर्व पदाधिकारी यांनी केली आहे.तसेचभव्य दिव्य अशा या कार्यक्रमांस समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)