पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा...
पंढरपूर प्रतिनिधी-- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निम्मित याही वर्षी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहर पातळीवर भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा सलग १३ वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे.
कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले व समाजसेवक किरण आप्पा भोसले यांच्या उपस्थित करण्यात आले. सदर या स्पर्धेसाठी १५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. इयत्ता १ ली ,२ री व इयत्ता ३ री,४ थी या गटात रंगभरण आणि इयत्ता ५ ते ७ यामध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शिक्षक आमदार यांनी बाल मित्रांशी संवाद साधून त्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही सर्वात मोठी स्पर्धा आहे असे उद्गार काढले. यावेळी बहुसंख्य पालक , माता भगिनी मोठ्या उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशिनाथ गोगाव सर,चंद्रकांत देसाई सर,सतीश चंद्रावर सर, राजकुमार ढवळे सर,अशपाक मुजावर सर, सुहास मासाळ गुरुजी,महेश भोसले सर व मान्यवर मंडळी तसेच मंडळातील सर्व सभासद.




