अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा

0

पंढरपूर  - अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिमेचे पूजन उद्योजक संजयमामा कोकाटे, उद्योजक सुहास शिर्के,प्रांत कार्यालय ऑफिसचे चंद्रकांत ढवळे,तलाठी मुसाफ काझी,महादेव देठे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर जिल्ह्याध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून करण्यात आले. यावेळी परिसर शिवरायांच्या  जयघोषाने दुमदुमून गेला होता. 

 त्यानंतर भव्य असा पालखी सोहळा प्रदक्षना मार्गावरुन काढण्यात आला. यावेळी बाल शिवभक्तांनी सुंदर असे लेझीम सादर केले.यावेळी पारंपारिक वाद्य सनई चौघडा, घोडे,बैलगाडी,ढोल ताशांचा गजर यांचाही समावेश होता.यावेळी घोड्यांवर बाल शिवभक्त,जिजाऊंच्या लेकी शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत होते. तसेच बाल शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या गाण्यावरती सुंदर असे  नृत्य सादरीकरण केले.

यावेळी उपस्थित माता,भगिनी व बांधव डोक्यावर भगवा फेटा बांधून होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे,युवक जिल्हाध्यक्ष शिवाजीराजे मोरे,पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष अमोल पवार जिल्हा सचिव गुटाळ, विलास देठे सर,सतिश धनवे सर,विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष हनमंत कदम, शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे, शहर संघटक काका यादव,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,शहर कार्याध्यक्ष पांडुरंग शिंदे ,महिला जिल्हाध्यक्षा प्रभावती गायकवाड, शहराध्यक्षा डॉ संगीता पाटील, युवती जिल्हाध्यक्षा अँड प्राजक्ता शिंदे, तालुका उपाध्यक्षा अर्चनाताई चव्हाण, शहर उपाध्यक्षा अश्विनीताई साळुंखे,राधिका ताई चव्हाण, संग्राम आसबे,सचिन थिटे,रोहित भैया चव्हाण लखन चव्हाण वैभव चव्हाण गणेश माने ,आनंद काळे आशपाक तांबोळी यांच्या सह मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)