कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकचे स्पोर्ट्स मध्ये ही वर्चस्व कायम.

0

पंढरपूर - इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट असोसिएट आयोजित सी- झोन  खो-खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी ही आपले वर्चस्व कायम ठेवून विजेतेपद पटकविले आहे. अंतिम सामन्या मध्ये शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज या संघावर एक डाव दोन गुणांनी विजय संपादित केला आहे. या स्पर्धा स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर येथे पार पडल्या. 

यामध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजचे खेळाडू रामचंद्र ढोबळे, गौरव खेडेकर, रितेश पाटील , रुपेश पाटील ,ओम उपाशे ,प्रवीण उपाशे ,चैतन्य वाघ. सिद्धेश्वर जवळेकर, ओमराज खेडेकर प्रसाद जाधव, चेतन कदम, श्रीराम कुलकर्णी, प्रेम धांडे, कृष्णा मोरे, प्रफुल पवार यांनी चमकदार कामगिरी करत यश संपादन केले. आता कर्मयोगी संघाचे महाराष्ट्र राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज येथे झालेल्या हॉलीबॉल मुलींच्या स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे.  त्यामध्ये आरती जाधव ,वैष्णवी जाधव,  कोमल पवार, पुष्पांजली केसकर, मुक्ता शिंदे,  आकांक्षा पाटील, गौरी वराडे, गौरी होनमाने यांनी सहभाग नोंदवला. 

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त मा.रोहन परिचारक, कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. अजित कणसे.  इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, रजिस्ट्रार गणेश वाळके यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक बी जे साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)