संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दत्ता ताड यांच्या पत्नी अश्विनी ताड यांची एकलासपूरच्या सरपंच पदी बिनविरोध निवड

0

तावशी प्रतिनिधी.... पंढरपूर तालुक्यातील सरपंच पदी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दत्ता ताड यांच्या पत्नी अश्विनी ताड यांची एकलासपूरच्या सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. एकलासपूरच्या सरपंच सुधामती अवताडे यांच्या निधनानंतर सरपंच पदाची जागा रिक्त होती यासाठी नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली त्यात सरपंच पदासाठी अश्विनी ताड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी पंकज राठोड यांनी बिनविरोध सरपंच म्हणून घोषित केले. यावेळी नूतन सरपंच अश्विनी ताड म्हणाल्या की गावातील सर्व नेते मंडळी व सर्व सदस्यांना विचारात घेऊन गावासाठी अनेक विकास कामे करू त्यात मी कुठेही कमी पडणार नाही. व प्रलंबित सर्व विकासकामे पूर्ण करू. 

यावेळी सहाय्यक निवडणूक म्हणून ग्राम महसूल अधिकारी अश्विनी शेंडे ग्रामसेवक सुहास शिंदे कोतवाल साहेबराव भोपळे यांनी काम पाहिलेयावेळी उपसरपंच हनुमंत ताड, ग्रामपंचायत सदस्य नितीन ताड ,सोनाली पाटील अंजना ताड सचिन माने ,बापू क्षीरसागर, रत्नप्रभा शिंदे हे उपस्थित होते तर सहकार शिरोमणी चे संचालक योगेश ताड ,तानाजी ताड दादासो कवडे, दत्तू नाना कवडे, रवींद्र शिंदे, तुकाराम ताड, गोरख ताड, किसन खवणकर ,बाळासो ताड ,रामचंद्र पाटील ,उद्योजक नंदकुमार अवताडे ,प्रभाकर ताड ,रायबा ताड, अनिल कुरे ,अविनाश कुरे, दादासो ताड, गुंडाप्पा ताड, सागर कुरे ,दाजी ताड ,यांचे सह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे काकडे ,मनेरी ,यांनी चौक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 

निवडीनंतर नूतन सरपंच अश्विनीताड यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)