पंढरपूर ( प्रतिनिधी) सध्या विधानसभेचे वारे सगळीकडे वाहत आहे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांना कोण त्या पक्षाकडून आपणास उमेदवारी मिळणार यांची खात्री राहिली नाही. जो तो.आपणास उमेदवारी मिळणार म्हणून प्रचार यंत्रणेत सहभागी झाले आहेत. पण मनसेचे नेते दिलीप बापु धोत्रे यांना पहिल्रा पाच उमेदवार मध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभेत मनसेची उमेदवारी मिळाली. व ती जाहीर पण झाली त्यानंतर बापुनी प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरूवातही केली, खरंतर बापूचा मतदार संघ पंढरपूर-मंगळवेढा म्हणजे धड शहर नाही आणि धड खेडे नाही फक्त यात्रेचे गाव असलेल्या अशा मतदारसंघाचे उमेदवारी करीत आहेत या आधी बापूंनी या मतदार संघात अनेक सार्वजनिक उपक्रम राबवले आहेत कोरोना काळात तर बापूंनी अनेकांना मदत केली,अनेकांना जीवदान दिले आहे, अन्नधान्य सुध्दा पुरविले आहेत.
खरे तर गोर गरीबाचा कैवारी दगडफोड्याचा मुलगा असे असताना सुद्धा बापूंनी आपल्या कष्टाचे व आपण कुठल्या परिस्थितीतून आलो यांची जाणीव ठेऊन यशाची शिखरे काबीज केली आहेत. यशाचे शिखरे काबीज केली म्हणून त्यानी कधीही आपला अहंपणा दाखवला नाही सर्व सामान्यांना न्याय देणे एवढे एकच काम बापूकडे आहे आणि या एकाच गोष्टीमुळे राज साहेबांच्या बाजुला मांडीला मांडी लावून ते बसलै आहेत. राजे साहेबांचा प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन हे बापु करत असतात. आज पंढरपूरसारख्या छोट्या शहरातील मनसे नेते दिलीप बापु धोत्रे यांची वाटचाल साधी नाही. त्यासाठी ध्येय, कष्ट, व प्रामाणिकपणा यांची जोड आहे. पंढरपूरच्या नागरिकांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत.आजच त्यांनी नागपूर येथे धम्मचक्र या वास्तूचे दर्शन घेण्रासाठी अनेक दलित बांधवांसाठी नागपूरला नेण्याचे नियोजन केले दलित बांधवांसाठी दीक्षाभूमी हे फार श्रद्धेचे स्थान आहे यासाठी त्यांनी अभिराज उबाळे व इतर मान्यवरांसोबत चर्चा करून या यात्रेचे नियोजन केले आहे. या यात्रेचा खर्च सर्वसामान्र माणसाला परवडणारा नाही व कितीही प्रामाणिक इच्छा असली तरी सर्वसामान्य माणून आर्थिक विवंचनेत अडकलेला असतो. त्यांची इच्छा असूनही तो त्यासाठी तयार होत नाही. हे त्यांनी हेरले व सर्व सामान्याची व्यथा जाणली व दिलीप बापुनी मनसेचे नेते यांनी नागपूर येथील दीक्षाभूमी चे दर्शन ज्याना घेता आले नाही त्या सर्वच व श्रद्धा असलेल्या नागरिकासाठी हा नागपूर दौर्याचे आयोजन केले आहे व आज या ठिकाणी नागपूर साठी प्रवास यंत्रणा राबवली आहे तसे तर अनेक प्रवास करणार्या नागरिकांच्या चेहर्यावर एक आनंदाचे हास्य होते ते मनसेनेते दिलीपबापूना धन्यवाद देत होते.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दलित बांधव हे बांधव नागपूर या ठिकाणी धम्मचक्र या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेऊ शकत नव्हते, जेणेकरून या ठिकाणी जाऊन दीक्षाभूमी चे घेतलेले नाहीत. असे असंख्य दलित बांधव, माता-भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना नागपूर येथील दीक्षाभूमी या ठिकाणी दर्शनासाठी घेऊन जाण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार ही धम्म यात्रा आज रोजी सायंकाळी नागपूरच्या दीक्षाभूमीच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. सर्व धर्म समभाव या या भावनेने ही धम्मयात्रा आयोजित केलेली आहे.
यापूर्वी काही दिवसांपूर्वी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील मुस्लिम बांधवांना अजमेर या पवित्र ठिकाणी जाण्याचे कित्येक मुस्लिम ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध, माता भगिनी, तरुण यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे या अजमेर या धार्मिक ठिकाणी जाता येत नव्हते. अशा मुस्लिम बांधवांच्या भावनेचा विचार करून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अजमेर यात्रा ही देखील आम्ही घडवलेली होती. त्याचप्रमाणे ही पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बौद्ध धर्मीय बांधवांच्यासाठी ही धम्म यात्रा आम्ही आयोजित केलेली असून या धम्म यात्रेस जवळपास 2000 च्या संख्येने दलित बांधव आंबेडकर प्रेमी, बौद्ध प्रेमी हे एकूण 14 बसेस मधून हा प्रवास करणार आहेत. यांचीही धम्मयात्रा सुखकर व्हावी व त्यांना नागपूर येथील दीक्षाभूमी या पवित्र ठिकाणाचे दर्शन व्हावे. अशी आशा आम्ही व्यक्त करीत आहोत. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये त्याचप्रमाणे या धम्म यात्रेच्या बसेसना निरोप देतेवेळी आपले मनोगत व्यक्त केले.


