पंढरपूर ; श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री.दिलीप बापू धोत्रे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून पहिल्या पाच उमेदवारामध्ये दिलीप बापुची उमेदवारी जाहीर झाली आहे.त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून बापुंनी मनसेच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत व करत आहेत. पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदार संघात गेली अनेक वर्षे सर्व सामान्यासाठी कामे केली आहेत. तर गेल्याच आठवड्यात मंगळवेढा येथे अमित साहेबांच्या हस्ते मनसे केसरी कुस्ती यांचे आयोजन केले होते त्याठिकाणी मंगळवेढा व पंढरपूर येथील अनेकांनी हजेरी लावली होती व मनसे केसरी कुस्ती यशस्वी रितीने पार पाडली होती अगदी 100 रूपायापासून 5 लाख रूपयापर्यंत च्या कुस्त्या पार पडल्या व त्यास या मतदार संघातील मतदारांनी त्यास उत्स्फुर्त साथ दिली.तर कुस्ती शौकीनांनी व मल्लांनी त्यास भरभरून साथ दिली.
आता दिपावली निमित्त मनसे व विरशैव महिला मंडळ यांच्या वतीने एकाच छताखाली दिपावली ही योजना राबविली आहे. यातही असंख्य महिला भगिनीनी यात सहभाग घ्यावा असे नियोजन केले आहे. जवळपास 200 स्टॉल पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदीर येथे होणार आहेत. दिपावली निमित्त अनेक स्टॉल उभारले जाणार आहेत. त्यासाठी या स्टॉलधारकाकडून कुठलेही शुल्क स्वीकारले जाणार नाही. व ज्यांना आर्थिक गरज आहे त्यांना दिलीप बापुच्या वतीेने बिगरव्याजी रक्कम दिली जाणार आहे. ती त्यांनी दिपावली खरेदीनंतर जमा करावयाची आहे.असे अनेक समाजउपयोगी उपक्रम ते राबवित आहेत.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचे दिलीप बापु धोत्रे यांनी 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर तीन दिवस पंढरपूर मतदार संघात खर्डी पासून गाव भेटीचा दौरा सुरूवात करणार आहेत. तपकिरी शेटफळ, तावशी, सिध्देवाडी, शिरगाव, एकलासपूर अनवली,रांझणी,मुंढेवाडी गोपाळपूर, उंबरगाव बोहाळी, कोर्टी, टाकळी, गादेगाव, कौठाळी, शिरढोण, वाखरी व कासेगाव या पंढरपूर तालुक्यातील गावामधून मनसेचे नेते दिलीप बापु गावभेटीचा दौरा करून तेथील मतदारांना आपल्या कार्याची माहिती देणार आहेत व तुम्ही मला निवडून आणले तर मी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचा कायापालट करणार आहे असे अभिवचन देणार आहेत. हेच अभिवचन या दौर्यात देणार आहेत. गेल्या काही वर्षात या मतदार संघात कुठलाही विकास झाला नाही त्यामुळे या मतदार संघातील मतदार नाखुष आहेत.यासाठी दिलीप बापुकडे सर्वच मतदार संघातील कार्यकर्ते व मतदार जवळीक सांधून आपल्या अडीअडचणी सांगणार आहेत व त्या सोडविण्यासाठी मनसेचे नेते दिलीप बापु त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यावर भर देणार आहेत.यामुळेच सर्वच राजकीय पक्षात व मातब्बर नेत्यामध्ये मनसेच्या दिलीपबापुनी खळबळ माजवून दिली आहे. त्यामुळे अनेक नेते चलबिचल झाले आहेत.
मनसे नेते दिलीप बापुंनी गावभेट दौर्याचे आयोजन केले आहे. मतदार संघातील सर्वांचे प्रश्न,अडचणी जाणून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढणार आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी मला सांगाव्यात म्हणजे त्यावर मी योग्य निर्णय घेऊन आपणास न्याय देईन. या गाव भेट दौर्यात स्थानिक मनसे कार्यकर्ते राहणार आहेत. त्यांना आपल्या अडचणी सांगितल्यास त्या माझ्यापर्यत पोहोचणार आहेत त्या निश्चितपणे मनसेच्या माध्यमातून सोडवून देणार आहे. तरी या गावभेट दौर्यात आपण उपस्थित रहावे ही विनंती आहे.
आज आपल्या सर्वांचे प्रश्न, अडीअडचणी जानुन घेण्यासाठी व आपणा सर्वांचा आशिर्वाद घेऊन या लढाईला सुरूवात करण्यासाठी मी आपल्या गावात येत आहे. तरीआपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन मला आपला बहुमुल्या असा वेळ व आशिर्वाद द्यावेत हीच नम्र विनंती





