स्वातंत्र्यदिनी पंढरपूर तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न

0


पंढरपूर (दि.15):- स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय येथे प्रांताधिकारी सच‍िन इथापे  यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा  शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे,  अपर तहसिलदार तुषार शिंदे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, नायब तहसिलदार विजय कुमार जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर पोलीस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.




 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)