सहकार शिरोमणी कारखान्यावर ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

0

भाळवणी - सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. कल्याणराव काळेसाहेब यांच्या हस्ते झेंडावंदन करून ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.  तसेच कारखाना कार्यस्थळावरील वसंतराव काळे विद्यामंदिरामध्ये कारखान्याचे संचालक मा. श्री. सुनिल सराटे-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी बोलताना मा. श्री. कल्याणराव काळेसाहेब म्हणाले,स्वातंत्र्य प्राप्तीनंतर स्वराज्याचे सुराज्य निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळे ग्रामीण भागातही सामाजिक, शैक्षणिक, सहकार अशा सर्वच क्षेत्रात प्रगती झालेली पहायला मिळते. स्व.वसंतराव दादानींही विविध क्षेत्रात लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. त्यांच्या सावलीत सुरू असलेल्या संस्था आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी सांघिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे सांगून श्री.काळेसाहेब यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

शाळेचे सचिव श्री.हणमंत जमदाडे सर, श्री. ई.बा.मुलानी गुरुजी यांनाही मनोगत व्यक्त केले. शाळेतील  मुलामुलींनी देशभक्तीपर भाषणे केली, कविता, कवायती सादर केल्या. विविध गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मा. कल्याणराव काळेसाहेब, मा.श्री. भारतनाना कोळेकर, संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आला.

आभार कारखान्याचे संचालक मा. श्री. मोहनबापू नागटिळक यांनी मानले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. श्री. भारतनाना कोळेकर,  मा. श्री.  मोहनबापू नागटिळक, मा. श्री. जयनाना देशमुख, मा. श्री. सुनिल पाटील, मा. श्री. परमेश्वर लामकाने, मा. श्री. सुरेशबापू देठे, मा. श्री. संतोषकुमार भोसले, मा. श्री. अमोल माने, मा. श्री. अरुण नलवडे, माजी संचालक मा. श्री. ई. बा. मुलानी गुरुजी, माजी उपसरपंच मा. श्री.  दाऊद शेख, शाळेचे सचिव मा. श्री. हणमंत जमदाडे सर, मुख्याध्यापक श्री.संजय काळेसर, शिक्षक, पालक, भाळवणी ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)