युवक कॉंग्रेसच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्षपदी सोमनाथ आरे

0

युवक कॉंग्रेसच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्षपदी सोमनाथ आरे

पंढरपूर - सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेस मधील कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत सोमनाथ रामचंद्र आरे यांची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा अध्यक्षपदी  नियुक्ती करण्यात आली असून  कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.खा.मल्लिकार्जुनजी खर्गे साहेब, मा.खा.सोनियाजी गांधी, जननायक मा.खा.राहुलजी गांधी साहेब, मा.सुशिलकुमारजी शिंदे साहेब, मा.सिध्दाराम म्हेत्रे साहेब, मा.खा.प्रणितीताई शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी व युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.श्री.कुणालजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य युवकांचे हक्काचे व्यासपीठ करण्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत घ्याल अशी आशा व्यक्त करतो. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य राहील, असा विश्वास सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनंजय पवार यांनी व्यक्त केला.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा नुतन अध्यक्ष सोमनाथ आरे यांना नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र  युवक कॉंग्रेसचे प्रभारी अजयजी चिंकारा यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रभारी ऐसान खान, प्रदेश उपाध्यक्ष शिवराजदादा मोरे, युवक कॉंगे्रस शहराध्यक्ष संदिप शिंदे, उपाध्यक्ष बाबू अग्रवाल यांच्यासह आदि कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होेते.

सोमनाथ आरे हे पंढरपूर तालुक्यात कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ते कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. उज्वला गॅस योजना, रक्तदान शिबीरे, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून देणे, वृक्षारोपण, अंधश्रध्दा निर्मुलन कार्यक्रम, व्यसनमुक्ती कार्यक्रम अशा विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत. त्यांनी यापूर्वी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा उपाध्यक्ष, विधानसभा कार्याध्यक्ष या पदांवर काम केलेले आहे.  त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)