सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटिव शुगर फॅक्टरी लि. नवी दिल्ली यांचा तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार

0

श्रीपुर -  सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटिव शुगर फॅक्टरी लि. नवी दिल्ली यांचा तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला होता सदर पुरस्काराचे वितरण आज रोजी नवी दिल्ली येथे देशाचे सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल व चौधरी लक्ष्मीनारायण सिंह – सहकार मंत्री उत्तर प्रदेश, आणि नॅशनल फेडरेशन कॉपरेटिव शुगर फॅक्टरी लि. नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

 पुरस्कार कारखान्याचे व्हा चेअरमन  कैलास खुळे ,सर्व संचालक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी यांनी स्वीकारला कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा नेहमीच देशात अग्रेसर राहिला असून गत हंगाम 2023- 24 मध्ये गाळप क्षमतेचा पुरेपूर वापर, स्टीमची बचत, कारखाना बंदचे अत्यल्प प्रमाण ,बगॅसची बचत, जास्तीची वीज निर्मिती ,जास्तीचा साखर उतारा याशिवाय अन्य तांत्रिक बाबीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे कारखान्यास देश पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाला असून यामध्ये कारखान्याचे व्हा चेअरमन, सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व कारखान्याचे अधिकारी त्याचबरोबर ऊस पिकवणाऱ्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे श्रेय असल्याची भावना कारखान्याचे चेअरमन  प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त करून या सर्वांचे अभिनंदन केले.

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास या अगोदर व्यवस्थापनाने उत्कृष्ट काम केल्यामुळे राज्य पातळीवरील व देशपातळीवरील 55 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा आज मिळालेला देशपातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेच्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे  अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड नवी दिल्ली यांचे कडून मिळालेला पुरस्कार स्वीकारण्यासाठी कारखान्याचे व्हा.चेअरमन  कैलासराव खुळे , दिनकरभाऊ मोरे, दाजी पाटील, तानाजी वाघमोडे  बाळासाहेब यलमार, भगवानराव चौगुले , भास्कर कसगावडे , लक्ष्मण धनवडे , गंगामामा विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, दिलीप गुरव, शामराव साळुंखे, राणू पाटील कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व अधिकारी उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)