विधानसभा निवडणूका होईपर्यंत मंदिर समिती बरखास्त करू नका - दत्तात्रय बडवे शिंदे

0




सध्याच्या मंदिर समितीत श्री संत तुकाराम महाराज वंशज व आजी माजी वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष बरखास्त केल्यास वारकरी सांप्रदाय भावना दुखावतील ; एकीकडे दिंड्याला 20 हजार व दुसरीकडे समिती बरखास्त तर महायुतीची वारकरी सांप्रदायाकडे बघण्याची दुटप्पी भावना स्पष्ट होईल-दत्तात्रय बडवे शिंदे यांची मागणी

पंढरपूर- पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीची 2 वर्षांपूर्वी मुदत जरी संपली तरी मंदिर पुरातत्व योजना राबविणार म्हणून 2 वर्ष मुदतवाढ दिली परंतू भाजपचे काही कार्यकर्ते व काही सामाजिक संघटना मंदिर समिती बरखास्त व पुर्नरचनेची मागणी करत आहेत. परंतू विधानसभेच्या निवडणूका होईपर्यंत वरील कारणास्तव मंदिर समिती बरखास्त व पुर्नरचना करू नका अशी मागणी सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे ब्राह्मण सेलचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बडवे - शिंदे यांनी केली आहे.
महायुती एकीकडे दिंड्यांना 20 हजार रूपये देतात व वारकरी सांप्रदायाचे समिती व सल्लागार समितीत 9 सदस्य आहेत असलेली समिती बरखास्त करतात काय ?केल्यास वारकरी सांप्रदायाबद्दल महायुतीच्या भावनाचे धोरण स्पष्ट होईल  महायुतीची दुटप्पी भूमिका आहे मुदत संपून 2 वर्ष झाले महायुती सरकार झोपले होते का ? विधानसभेला चार महिने राहिले आता बरखास्त करून काय उपयोग उलट वारकऱ्यांच्या भावना दुखावल्यामुळे वारकऱ्यांनी महायुतीच्या धोरणाची दिशा बघा एवढेच म्हणावे लागेल. याबाबत वारकरी सांप्रदायाने सावध भूमिका घ्यावी व येणाऱ्या निवडणूकीत महायुतीला धडा शिकवावा असे आवाहन कॉंग्रेस ब्राह्मण सेलचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बडवे शिंदे यांनी केले आहे.
या निवेदनाची प्रत मा.मुख्यमंत्री सोा महाराष्ट्र राज्य, मा.उपमुख्यमंत्री सोा व मा.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री सोा महाराष्ट्र राज्यमा.चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजप यांना पाठवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)