सहकार शिरोमणी कारखान्यामध्ये ऊस तोडणी वाहतुक करारास प्रारंभ

0

चंद्रभागानगर, भाळवणी :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या येत्या गळीत हंगाम सन २०२४-२५ साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने ऊस तोडणी वाहतुकीचे करार करण्याचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन मा. श्री. कल्याणराव वसंतराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचे व्हा.चेअमरन मा.श्री. भारत सोपान कोळेकर व तोडणी वाहतुक उपसमिती चेअरमन मोहन वसंत नागटिळक यांचे शुभहस्ते श्रीविठ्ठल व स्व्. वसंतदादांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आला. यावेळी ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार धनाजी कवडे, शंकर बागल, अर्जुन बागल, सुरेश बागल, संग्राम कवडे यांचे ऊस तोडणी वाहतुकीचे प्राथिनिधिक करार करण्यात आले.

गळीत हंगाम २०२४-२५ करीता सहकार शिरोमणी कारखान्याकडे सुमारे ११००० एकर ऊसाची नोंद झाली असून, शेती विभागाचे चिटबॉयमार्फत ऊसाच्या नोंदी घेण्याचे काम चालु आहे. त्यामुळे कारखान्याकडे झालेल्या ऊसाच्या नोंदी व यापुढे होणाऱ्या ऊस नोंदीचा याचा विचार करुन सुमारे ४ लाख २५ हजार मे.टन गळीताचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दैनंदिन सरासरी ३५०० मे.टन ऊसाचे गळीत होण्याच्यादृष्टीने २७५ ट्रक व ट्रॅक्टर, ३०० बैलगाडी, १०० बजेंट ट्रॅक्टर गाडी व ३ ऊस तोडणी मशिनचे करार करुन ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज् ठेवण्यात येणार असल्याचे व्हा. चेअरमन भारत कोळेकर यांनी सांगितले. गळीत हंगाम सन २०२४-२५ मध्ये डिस्टीलरी प्रकल्प व सहवीज निर्मिती प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालविण्यात येणार असून, मशिनरी देखभाल दुरुस्तीची कामे नियोजीत वेळेत पुर्ण करण्यात येणार असल्याचे सांगुन कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत-जास्त् ऊस तोडणी वाहतुक ठेकेदारांनी कारखान्याचे शेती विभागाशी संपर्क साधुन येत्या गळीत हंगामासाठी आपले करार करावेत असे अवाहनही श्री. कोळेकर यांनी केले.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक परमेश्वर लामकाने, प्र. कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे, शेती अधिकारी प्रतापराव थोरात व ऊस पुरवठा अधिकारी हरीभाऊ गिड्डे, सर्व अॅग्री ओव्हरसिअर व ऊस वाहतुक ठेकेदार उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)