चांगला वक्ता होण्यासाठी प्रयत्नांची गरज - रामचंद्र इकारे

0

 


अभिनव अकॅडमीच्या 14 व्या batch चा समारोप समारंभ 

पंढरपूर - प्रभावी वक्तृत्व शैली लाभावी असे प्रत्येकालाच वाटत असते. वक्तृत्व ही प्रयत्नसाध्य कला असल्यामुळे चांगला वक्ता होण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी, लेखक रामचंद्र इकारे यांनी केले. ते अभिनव अकॅडमीच्या विद्यार्थी बॅच समारोप समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका मा. सौ. मीराताई परिचारक उपस्थित होत्या.


अभिनव अकॅडमीच्या वतीने आयोजित चौदाव्या विद्यार्थी बॅचच्या समारोपप्रसंगी बोलताना इकारे पुढे म्हणाले, की वक्ता हा समाजाचे प्रबोधन करणारा असतो. ज्या समाजासाठी आपल्याला काम करायचे आहे, त्या समाजातील प्रश्न - समस्या जाणून घेण्यासाठी त्याने आपली निरीक्षण शक्ती वाढविली पाहिजे. समस्या निर्माण झाल्या तरी त्यावर मात करत आलेल्या प्रत्येक संधीचा उपयोग करत वक्त्याने प्रयत्नपूर्वक आपली भूमिका मांडली पाहिजे. या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी बालसाहित्यिका आशा पाटील यांनी कथाकथन कसे करावे याबाबत कथेचे सादरीकरण करत मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोपामध्ये मीराताई परिचारक यांनी वक्ता हा नेहमी संवेदनशील असला पाहिजे. प्रत्येक वक्त्याने अभ्यासू असले पाहिजे, घर उजळून जाण्यासाठी घरामध्ये दिवा सगळेच लावतात पण अभिनव अकॅडमीने वक्तृत्वकलेच्या प्रसाराचा दिवा उंबरठ्यावर लावून समाजात वक्तृत्वाचा प्रसार केला असे मत व्यक्त करून अभिनवच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदित्य कटकदौंड याने उपस्थितांचे स्वागत केले. वेदिका खोबरे हिने अध्यक्षीय सूचना मांडली तर हर्षवर्धन लेंडवे याने अध्यक्षीय सूचनेस अनुमोदन दिले. प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. श्रावणी भोसले हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्नेहा कोटगिरी, सई पोरे व गौरी भोसले या प्रशिक्षणार्थींनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी वेदांत मोरे, विशालाक्षी कौलवार, आर्यन कुलकर्णी, आर्या खिलारे, शौर्य खुने, पद्मनाभ शिंगण  या प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली तर अभ्यागत व्याख्यात्या डॉ.मैत्रेयी केसकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी बॅचचा आढावा सादर केला. प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शेवटी आकृती सोनटक्के हिने आभार मानले तर ऱ्हिदान गोसावी, करुणा जाधव, सई तेंडुलकर व श्रेया नलावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

             या कार्यक्रमाच्या प्रसंगी अकॅडमीचे संचालक मंदार केसकर, अभ्यागत व्याख्याते डॉ.सचिन लादे, सोमनाथ गायकवाड, माया कुलकर्णी, पत्रकार नवनाथ पोरे, शांताराम गाजरे सर, आनंद नगरकर सर, राधेश बादले पाटील, महेश तेंडुलकर, प्रा. गोविंद भोसले, प्रताप चव्हाण सर, रवि ओहोळ सर, बाळासाहेब डिंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल खिस्ते, वैष्णवी बागल, तनुश शिंदे, गुरुदास कौलवार, वैदेही देशपांडे, ईश्वरी पवार.. प्रशिक्षणार्थींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)