पवित्र रमजाननिमित्त अभिजीत पाटील यांच्यावतीने इफ्तार पार्टी पंढरपुरात संपन्न

0

हिंदू-मुस्लिम समाजाकडून पाटील यांचे झाले कौतुक

पंढरपूर /-  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये स्टेशन मज्जिद, बडा कब्रस्तान याठिकाणी रमजाननिमित्त इफ्तार पार्टींचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक कार्यात पाटील हे नेहमीच अग्रेसर राहिलेले दिसून येतात. सर्वधर्म समभाव हा त्यांच्या कार्याचा स्थायीभाव आहे, हे पुन्हा एकदा त्यांच्या या उपक्रमातून सिद्ध झाले..या अनुषंगाने सर्वत्र अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असून हिंदू मुस्लिम बांधवांत दिसून आले. समता आणि सामाजिक बंधुत्व यांची प्रगाढ वीण गुंफणाऱ्या पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टी निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना भेटून अभिजीत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, काँग्रेसचे नितीन नागणे, जेष्ठ बजरंग बागल, नागनाथ अधटराव, ॲड. यासिन शेख, ममंहदभाई लिगाडे, मा.नगरसेवक शुकुर बागवान, युसूफ मुजावर, अरीफ बेळगांवकर, समीर मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नेते सुधीर भोसले, देगाव ग्रामपंचायत सदस्य आनंद पाटील, विठ्ठल कारखान्याचे संचालक गणेश ननवरे, दत्तात्रय नरसाळे, उमेश मोरे, डिव्हीपी बॅकेचे संचालक परवेज मुजावर यासह आदी हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)