प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमधून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात चार कोटी निधी मंजूर

0

 


मंगळवेढा  -पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये लोकप्रतिनिधीनी सूचित केलेल्या कामांना शासनाने मंजुरी दिली असून मंगळवेढा पंढरपूर मतदार संघासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना दिली.

यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील भैरवनाथ मंदिरासमोर यात्री निवारा शेड उभारणे १० लाख,सलगर येथे हनुमान मंदिरासमोर निवाराशेड उभा करणे ०६ लाख,तामदर्डी येथील रंगसिद्ध मंदिरासमोर यात्री निवारा शेड उभारणे १० लाख, गुंजेगाव येथे सोमलिंग मंदिरासमोर यात्री निवारा शेड बांधणे १५ लाख,डोनज येथील महासिद्ध मंदिरासमोर सभा मंडप बांधणे १५ लाख, हुन्नूर येथे दत्ताश्रमासमोर सभा मंडप बांधणे १५ लाख, बठाण येथील बोधले महाराज मंदिर येथे सभामंडप बांधणे २० लाख,मारापुर येथील खंडोबा मंदिर समोर सभा मंडप बांधणे २० लाख, उचेठाण येथे मारुती मंदिरासमोर निवारा शेड बांधणे १० लाख,माचनूर येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर सभामंडप बांधणे २० लाख ,खडकी येथील सुमती माता मंदिरासमोर सभा मंडप बांधणे १५ लाख,अकोला येथील काळभैरव मंदिर समोर सभा मंडप बांधणे २० लाख, लवंगी येथील पीर साहेबांसमोर सभा मंडप बांधणे १५ लाख,जंगलगी येथील अमोगसिद्ध मंदिर समोर सभा मंडप बांधणे १५ लाख,मल्लेवाडी येथील खंडोबा मंदिर समोर सभा मंडप बांधणे १० लाख, देगाव येथील मायाक्का मंदिरासमोर सभा मंडप बांधणे १० ला, घरणींकी येथील हनुमान मंदिर समोर सभा मंडप बांधणे १५ लाख,ब्रह्मपुरी येथील हनुमान मंदिरासमोर सभा मंडप बांधणे १५ लाख, बोराळे येथील सोमलिंग मंदिरासमोर सभा मंडप बांधणे २० लाख, भालेवाडी येथे शंभू महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे १५लाख, यड्राव येथील हनुमान मंदिरासमोर सभा मंडप बांधणे सात लाख कागष्ट येथील मस्कोबा मंदिर समा मंडप बांधणे १५ लाख,सोडडी येथील रेवनसिद्ध मंदिरासमोर यात्री निवारा शेड बांधणे १५,लाख, राहटेवाडी येथील हनुमान मंदिरासमोर सभा मंडप बांधणे १५ लाख,आणि पंढरपूर शहरातील यमाई तलाव विकसित करणे ५७ लाख रुपये असे मिळून चार कोटी रुपये पंढरपूर मतदार संघांमध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमधून मिळाले असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)