पंढरपूर - अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने 15 मार्च हा ग्राहक दिन सुहास मेडिकल या ठिकाणी साजरा केला ग्राहक पंचायतीचे जनक कैलास वाशी बिंदू माधव जोशी व प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ ग्राहक विलास बडवे यांच्या हस्ते करण्यात आले
ग्राहकांना आणि खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तू बाबत बदलून मिळण्याचा हक्क नव्हता तो ग्राहक संरक्षण कायद्यामुळे प्राप्त झाला पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून व ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो ग्राहकांनी वस्तू खरेदी करणारा बिल अथवा पावतीचा आग्रह करावा वस्तूची एक्सपायरी डेट व तारीख पाहून घ्यावी नागरिकांनी जागरूक असणे गरजेचे असून कोणत्याही बाबत ग्राहकास अडचण आल्यास ग्राहकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदस्य यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या तक्रारीचे निवारण करावे असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत हरदास तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये जिल्हा सदस्य पांडुरंग अल्ला जिल्हा सचिव सुहास निकटे जिल्हा संघटक महेश भोसले दिलीप पंदे आधी उपस्थित होते.
१)युवा मेडीलाइन्स
२)सचिन जनरल स्टोअर्स
३)नयनतारा ऑप्टिकल्स
४)अहेल्थ 24तास औषध सेवा
५) शिव शौर्य मेडिकल्स
यांना भेट देऊन ग्राहकांना उत्तम सेवा देणाऱ्या व्यवसायकांचा सन्मान व ग्राहक दिनाची माहिती देण्यात आली.
माता निर्मला देवी संचलित रुक्मिणी विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांना वरील किमती संदर्भात व इतर माहिती ग्राहक दिनाच्या निमित्ताने महेश भोसले सर यांनी देऊन विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन केले तसेच शहरातील तसेच शहरातील विविध दुकाने उत्कृष्ट सेवा देणाऱ्या दुकाने मॉल या ठिकाणी जाऊन ग्राहक पंचायतीच्या वतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश भोसले सर यांनी केले तर आभार दिलीप पंदे सर यांनी मानले




